मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात ७ जूनला धडकणार!

मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात ७ जूनला धडकणार!

केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय. तीन दिवस आधीच पावसाचं आगमन झालंय.

  • Share this:

29 मे : आता एक आनंदाची बातमी! ज्याची आपण चातकासारखी वाट पाहत होतो, तो मान्सून आलाय. केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय. तीन दिवस आधीच पावसाचं आगमन झालंय.

त्यामुळे आता महाराष्ट्रात 7 जूनला पाऊस येणार, असं हवामान खात्यानं सांगितलंय. महाराष्ट्राला सध्या वेध लागलेत ते पावसाचे. उकाडा आणि घाम इतका आहे की असं झालंय कधी पाऊस पडतोय. रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. तर सिंधुदुर्गातही अनेक ठिकाणी सरी पडतायेत.

First published: May 29, 2018, 12:14 PM IST

ताज्या बातम्या