या राज्यांमध्ये 2 जुलैपर्यंत पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

या राज्यांमध्ये 2 जुलैपर्यंत पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

Monsoon Alert : 2 जुलैपर्यंत देशातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जून : अखेर तो आला! मुंबईसह राज्यभर पावसाची वाट पाहिली जात असताना मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. मुंबई, पुणे, ठाणे, कोकण या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. शिवाय, देशाच्या अन्य राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि बिहारमध्ये 2 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. यावर्षी मान्सूनचं आगमन हे काही दिवस लांबलं. अद्याप मान्सून सर्व देशात देखील सक्रीय झालेला नाही. पण, राज्यात मात्र मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून उशिरानं दाखल होण्यास वायू चक्रीवादळ देखील कारणीभूत ठरलं आहे. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

जम्मू - काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ द्या – अमित शहा

मुंबईत मुसळधार

मध्यरात्रीपासून ठाणे, मुंबईत मुसळदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या तोंडावर समाधान देखील दिसत आहे. पण, पहिल्याच पावसात मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागला. शिवाय, लोकल सेवेवर देखील पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे 10 ते 15 मिनिटं लोकल उशिरानं धावत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमधील काही भागांमध्ये पाणी साचल्याचं देखील चित्र पाहायाला मिळत आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 8 कोटी PF धारकांना बसेल मोठा धक्का

नाले तुबंले

मुसळधार पावसमुळे मुंबईतील नाले तुंबल्याचं देखील चित्र देखील पाहायाला मिळालं. त्यामुळे पालिकेच्या कामावर देखील चौफेर टीका केली.

कोकणात मुसळधार

कोकणात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत असून भात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

VIDEO: मुसळधार पावसानं प्लॅटफॉर्मवरच आला धबधबा

First published: June 28, 2019, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading