Monsoon 2021: दिलासादायक बातमी! दुष्काळाची कोणतीही शक्यता नाही, वाचा कसा असेल यंदाचा मान्सून?

Monsoon 2021: दिलासादायक बातमी! दुष्काळाची कोणतीही शक्यता नाही, वाचा कसा असेल यंदाचा मान्सून?

जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मॉन्सून 2021 (Monsoon in 2021) मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या (LPA) 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळाची (Drought) शक्यता नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

मुंबई 13 एप्रिल : स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान अंदाज संस्थेने मंगळवारी सांगितले की जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मॉन्सून 2021 (Monsoon in 2021) मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या (LPA) 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळाची शक्यता नसल्याचंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत एलपीएचा (LPA for June to September rainfall) अंदाज 880.6 मिमी इतका आहे. हा अंदाज खरा ठरल्यास देशात प्रत्यक्षात 907 मिलिमीटर पाऊस राहील.

Weather Alert: राज्यावर अवकाळीचं सावट; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

स्कायमेटनं जाहीर केलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार देशभरात खरंच इतक्याच प्रमाणात पाऊस पडल्यास, पावसाळ्याच्या महिन्यांत सलग तिसर्‍या वर्षी भारतामध्ये सामान्य ते साधारण पाऊस पडेल. 2020 मध्ये देशात एलपीएच्या 109 टक्के पाऊस होता तर 2019 मध्ये हा आकडा 110 टक्के इतका होता. एलपीएच्या 96-104 टक्के पाऊस म्हणजेच साधारण समजला जातो. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावेळी भारतात 1996 ते 1998 दरम्यान सलग तीन वर्षे सामान्य पावसाळा होता.

निवडणूक प्रचार बंगालला पडला महागात! कोरोना मृत्यूदर प्रचंड वाढला

स्कायमेटनं असंही म्हटलं आहे, की देशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता 85 टक्के आहे. तर, सरासरीपेक्षा कमी किंवा व्यापक दुष्काळाची शक्यता 2021 मध्ये नाही. त्यामुळे, बळीराज्यासाठी नक्कीच ही दिलासादायक बातमी आहे. जून ते सप्टेंबर महिन्यांत पूर्व आणि मध्य भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर व उत्तर-पश्चिम भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, असंही स्कायमेटनं म्हटलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 13, 2021, 3:29 PM IST

ताज्या बातम्या