Home /News /national /

BJP नेत्याच्या पत्नीवर माकडांचा हल्ला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

BJP नेत्याच्या पत्नीवर माकडांचा हल्ला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

माकडाच्या हल्ल्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.

    उत्तर प्रदेश, 08 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शामली येथे माकडांची (Monkey) दहशत आहे. माकडांच्या उच्छादानं भाजपच्या पत्नीचा बळी घेतला आहे. कैराना शहरात माकडांचा धुमाकूळ सुरुच असतो. मात्र असे असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. याचा परिणाम आता दिसून आला आहे. माकडाच्या हल्ल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल चौहान यांची पत्नी आणि जिल्हा पंचायतच्या माजी सदस्या सुषमा चौहान यांचा मृत्यू झाला आहे. सुषमा चौहान यांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. भाजपचे माजी खासदार दिवंगत बाबू हुकम सिंह यांची पुतणी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल चौहान यांची पत्नी सुषमा देखील राजकारणात सक्रिय होत्या. प्रभाग क्रमांक 13 मधून त्या जिल्हा पंचायत सदस्या होत्या. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्या मंदिरातून परत आल्या. घरी आल्यावर त्यांना घराच्या दुसऱ्या मजल्यावर माकडांचा कळप दिसला. शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्याचा वावर; मध्यरात्री घुसखोरी करत एका कुत्र्याला केलं भक्ष्य सुषमा माकडांना पळवत होती. या दरम्यान, माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान, सुषमा यांचा तोल गेला आणि त्या पायऱ्यांवरून घसरुन थेट सरळ जमिनीवर आदळल्या. सुषमा यांना पती अनिल चौहान आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी तात्काळ शामली येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथे डॉक्टरांनी सुषमा चौहान यांना मृत घोषित केलं. SSC GD Exam 2021: खूशखबर..! 25 हजार कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली होती. हजारो लोकांच्या उपस्थितीत मायापूर फार्म हाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या