माकडांचं लागणार धुमधडाक्यात लग्न, कोट्यवधींची संपत्ती आणि महालही मिळणार

माकडांचं लागणार धुमधडाक्यात लग्न, कोट्यवधींची संपत्ती आणि महालही मिळणार

तुम्ही अक्षयकुमारचा एंटरटेनमेंट हा सिनेमा पाहिलाय का ? या सिनेमामध्ये एका कुत्र्याचं नाव असतं एंटरटेनमेंट. हा एंटरटेनमेंट नावाचा कुत्रा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक बनतो. हे झालं चित्रपटातलं पण आता ही घटना खऱ्या आयुष्यातही घडलीय. आसाममध्येही खरंच एक माकड करोडपती बनणार आहे.

  • Share this:

सिलचर (आसाम), 19 जुलै : तुम्ही अक्षयकुमारचा एंटरटेनमेंट हा सिनेमा पाहिलाय का ? या सिनेमामध्ये एका कुत्र्याचं नाव असतं एंटरटेनमेंट. हा एंटरटेनमेंट नावाचा कुत्रा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक बनतो. हे झालं चित्रपटातलं पण आता ही घटना खऱ्या आयुष्यातही घडलीय. आसाममध्येही खरंच एक माकड करोडपती बनणार आहे.

या माकडाचं नाव आहे, मिंटू बाबू. मिंटू बाबूच्या नावाने एक महालही बांधला जाणार आहे आणि मिंटू बाबूसाठी महाल बांधण्यासाठी एका व्यक्तीने त्याचं जीवन पणाला लावलं आहे. सिलचर शहरात राहणारे शुभ्रांशु शेखर नाथ हे मिंटूसाठी महाल बनवत आहेत. याची कहाणीही मोठी हृद्य आहे.

शुभ्रांशु जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना या माकडाची साथ मिळाली. या माकडाने त्यांना पुन्हा कॅनडाला जाऊ दिलं नाही.

भारतात आल्यावर भेटलं माकड

शुभ्रांशु शेखर यांचे कुटुंबीय कॅनडामध्ये राहतात. 24वर्षांपूर्वी ते कॅनडामध्ये इंजिनिअरचं काम करायचे. पण त्यांना भारताची ओढ लागल्यामुळे ते पुन्हा मायदेशात आले. इथे सिलचरच्या त्यांच्या घरी त्यांना हे माकड भेटलं. त्यांना मिंटूचा एवढा लळा लागला की त्याला सोडून त्यांना पुन्हा कॅनडालाही जाववत नव्हतं. शुभ्रांशु या माकडाला त्यांच्या मुलासारखं जपतात.

(वाचा : गोव्यामधल्या स्कार्लेट एडन खून प्रकरणी आरोपीला 10 वर्षं तुरुंगवास )

मिंटूचा जन्म 28 फेब्रुवारी 2017 ला झाला. आता दोन वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या या माकडासाठी शुभ्रांशु यांना महाल बांधायचा आहे. त्याचबरोबर त्याचं लग्न लावण्यासाठी त्यांनी एक माकडीणही शोधली आहे. या माकडांचं लग्न थाटामाटात लावलं जाणार आहे आणि यासाठी शुभ्रांशु शेखर यांचे कुटुंबीय भारतात येणार आहेत.

मिंटू माकड आणि मॅकी माकडीण या दोघांचं लग्न धुमधडाक्यात होणार आहे आणि या दोघांना लग्नात एक महालही भेट देण्यात येणार आहे. ही दोन माकडंच नाही तर जंगलातून शहरात आलेल्या माकडांचंही या महालात जंगी स्वागत केलं जाईल.

============================================================================================

पाणी मागताच ग्रामसेवकानं दाखवलं पिस्तूल; VIDEO व्हायरल

First published: July 19, 2019, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading