पाहा VIDEO : या शहाण्या माकडाने पाणी पिऊन झाल्यावर तातडीने नळ केला बंद

पाहा VIDEO : या शहाण्या माकडाने पाणी पिऊन झाल्यावर तातडीने नळ केला बंद

बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता असलेल्या माणसांनाही जे जमत नाही ते या माकडाने करून दाखवलं आहे. पाणी वाया घालवू नका हा आपल्या पूर्वजाने दिलेला संदेश आपण किती मनावर घेणार हा मात्र प्रश्न आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे सगळेच जण चिंतेत होते. आता समाधानकारक पाऊस झाला असला तरी चेन्नई, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते आहे. त्यामुळेच पाण्याचा एकेक थेंब वाचवणं कसं महत्त्वाचं आहे याबद्दल पर्यावरण तज्ज्ञ कळकळीने सांगत आहेत.

आपल्या सगळ्यांनाच हा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे, एका माकडाने. ट्विटरवर सध्या या माकडाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे माकड नळ उघडून पाणी पितं आणि पाणी पिऊन झाल्यावर व्यवस्थितपणे नळ बंद करतं.

बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता असलेल्या माणसांनाही जे जमत नाही ते या माकडाने करून दाखवलं आहे. पाणी वाया घालवू नका हा आपल्या पूर्वजाने दिलेला संदेश आपण किती मनावर घेणार हा मात्र प्रश्न आहे. भारतामध्ये केवळ 42 टक्केच पाऊस झालेला असताना आपण या माकडाचं अनुकरण करायला हवं आणि पाणी वाचवायलाच हवं.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओला नेटकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. पाणी वाचवण्याचा हा संदेश हनुमानानेच आपल्याला दिला आहे, अशी प्रतिक्रिया काहीजणांनी दिली.

अरे बापरे! या 10 देशांमध्ये विकलं जातं सर्वात जास्त प्लॅस्टिक

भारतीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक पटींनी तो शेअर झाला. पाणी पिऊन आपली तहान भागवून झाल्यानंतर कोणतेही क्षण वाया न घालवता या माकडाने लगेचच नळाची तोटी बंद केली. हे खरंच पाहण्यासारखं आणि अनुकरण करण्यासारखं आहे.

===============================================================================================

VIDEO: कृष्णा नदीचं ड्रोनमधून नयनरम्य दृष्य; नदीकाठचा परिसर, शेती जलमय

Published by: Arti Kulkarni
First published: August 2, 2019, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading