Home /News /national /

देशातल्या 'या' गावात माकडांची प्रचंड दहशत, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पालकांची विचित्र कसरत

देशातल्या 'या' गावात माकडांची प्रचंड दहशत, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पालकांची विचित्र कसरत

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

या गावामध्ये माकडांची मोठी दहशत आहे. माकडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ एकटे घराबाहेर पडण्यास घाबरतात. माकडं लहान मुलांवर हल्ला करतील, अशी भीती पालक आणि शिक्षकांना नेहमीच वाटते.

    बऱ्याचदा लहान मुलं (Children) शाळेत जायला तयार नसतात. त्यामुळे रोज शाळेत (School) जायची वेळ आली, की ती कोणतंही कारण पुढं करतात किंवा रडू लागतात. अशा वेळी पालक मुलांना बळजबरीने शाळेत नेऊन सोडतात. शाळेच्या गेटसमोर असं चित्र हमखास पाहायला मिळतं. विशेषतः सुट्ट्या संपल्यानंतर मुलांना शाळेत सोडणं पालकांसाठी खूप जिकिरीचं असतं; पण यामागे मुलांनी नियमित शाळेत जावं, शिक्षण घ्यावं हा पालकांचा हेतू असतो. आज आम्ही तुम्हाला पंजाबमधल्या (Punjab) एका गावातल्या शाळेविषयी गंमतीदार माहिती देणार आहोत. या गावातले सर्व पालक आपल्या मुलांना हातात जाडजूड काठी घेऊन शाळेत सोडायला येतात. खरं तर यामागे वेगळंच कारण आहे. आमलपूर गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माकडं (Monkey) आहेत. ही माकडं ग्रामस्थांना त्रास देतात. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला (Forest Department) माहिती दिली आहे; पण अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पंजाबमधल्या संगरूरमधल्या आमलपूर गावातले पालक मुलांना शाळेत सोडताना आणि परत मुलांना घरी घेऊन जाताना आपल्या हातामध्ये आवर्जून मोठी काठी ठेवतात. इतकंच नाही, तर या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनाही हातात काठी घेऊनच शाळेत प्रवेश करावा लागतो. ही गोष्ट आश्चर्यकारक असली तरी खरी आहे. (चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, कर्जाच्या कचाट्यात अडकलात? मिळवा 'अशी' मुक्तता) या गावामध्ये माकडांची मोठी दहशत आहे. माकडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ एकटे घराबाहेर पडण्यास घाबरतात. माकडं लहान मुलांवर हल्ला करतील, अशी भीती पालक आणि शिक्षकांना नेहमीच वाटते. "ही समस्या खूप मोठी आहे. माझ्या निदर्शनास ती आली आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. लवकरच या प्रश्नावर तोडगा निघेल", असं एसडीएम नवरीत कौर सेखॉन यांनी सांगितलं. ही समस्या वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वीच कळवण्यात आली आहे. परंतु, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. "आमलपूर गावाच्या परिसरात 200 पेक्षा जास्त माकडं आहेत. ही माकडं रोज माणसांना त्रास देतात. एकट्या व्यक्तीला शाळेत जाणं मुश्किल आहे. त्यामुळे सकाळी पालक येण्याची वाट पाहावी लागते. सर्व पालक हातात मोठी काठी घेऊन शाळेत येतात. शाळेच्या सुट्ट्या संपल्यानंतरही याच पद्धतीनं शाळेत प्रवेश करावा लागतो", अशी माहिती मुख्याध्यापिका गीता राणी यांनी दिली. या माकडांची दहशत इतकी जबरदस्त आहे, की दुसऱ्या गावांमधले नागरिक आपल्या मुलींचा विवाह (Marriage) आमलपूरमधल्या मुलांशी करण्यासही घाबरतात, असं ग्रामस्थ सांगतात.
    First published:

    पुढील बातम्या