प्रियांकांच्या साथीनं रॉबर्ट वाड्रा ईडीसमोर हजर

प्रियांकांच्या साथीनं रॉबर्ट वाड्रा ईडीसमोर हजर

मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ईडी समोर हजर झाले.

  • Share this:

6 फेब्रुवारी, दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ईडी समोर हजर झाले. विशेष बाब म्हणजे प्रियांका गांधी रॉबर्ड वाड्रा यांना सोडण्यासाठी ई़डीच्या कार्यालयापर्यंत आल्या होत्या. रॉबर्ट यांना सोडून प्रियांका गांधी परत माघारी फिरल्या. तपास यंत्रणांपुढे हजर होण्याची रॉबर्ट वाड्रा यांची ही पहिलीच वेळ आहे. रॉबर्ट वाड्रा यांना जवळपास 40 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील अशी माहिती समोर येत आहे. ईडी कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वी रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांची टीम हजर झाली होती.

दरम्यान, मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी रॉबर्ट वाड्रा यांनी पटियाला कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण

मनी लाँडरिंगचं प्रकरण लंडनमधील मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. लंडनमधील 'ब्रायनस्टन स्क्वेअर' येथे 17 कोटी रूपयांचा प्लॅट रॉबर्ट वाड्रा यांनी खरेदी केला होता. फ्लॅट विकत घेताना मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. शिवाय, हा फ्लॅट देखील वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ईडीचा दावा आहे.

First published: February 6, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading