मनी लाँड्रिंग केस: रॉबर्ट वाड्रांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांली सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2019 05:06 PM IST

मनी लाँड्रिंग केस: रॉबर्ट वाड्रांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

7 फेब्रुवारी, दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. बुधवारी देखील रॉबर्ट वाड्रा यांची जवळपास सहा तास चौकशी करण्यात आली. ब्रिटनमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेशी संबंधित हे सारं प्रकरण आहे. मालमत्ता खरेदी प्रकरणामध्ये पैशांची अफरातफर झाल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे.

दरम्यान, सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यापूर्वी वकिलांची टीम देखील ईडीच्या ऑफिसबाहेर दाखल झाली होती. दोन तासाच्या चौकशीनंतर रॉबर्ट वाड्रा यांना जेवणासाठी सोडण्यात आले होते. तासाभराच्या ब्रेकनंतर रॉबर्ट वाड्रा पुन्हा ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले.

बुधवारी झालेल्या चौकशीसाठी प्रियांका गांधी-वाड्रा रॉबर्ट वाड्रा यांना सोडण्यासाठी ईडीच्या कार्यालयापर्यंत आल्या होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. ईडीसमोर हजर होण्याची रॉबर्ट वाड्रा यांची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, माझ्या कुटुंबाच्या पाठिशी मी खंबीरपणे उभी अाहे, अशी प्रतिक्रिया पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी प्रियांका गांधी-वाड्रा यांनी दिली आहे. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी ईडीनं लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

यापूर्वी रॉबर्ट वाड्रा यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून पटियाला कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयानं त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

Loading...

मनी लाँडरिंगचं प्रकरण लंडनमधील मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. लंडनमधील 'ब्रायनस्टन स्क्वेअर' येथे 17 कोटी रूपयांचा प्लॅट रॉबर्ट वाड्रा यांनी खरेदी केला होता. फ्लॅट विकत घेताना मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. शिवाय, हा फ्लॅट देखील वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ईडीचा दावा आहे.


VIDEO : AICC कार्यक्रमात राहूल गांधी म्हणाले...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...