Money Laundering Case : परवानगीशिवाय रॉबर्ट वाड्रांना देश सोडण्यास मनाई

Money Laundering Case : परवानगीशिवाय रॉबर्ट वाड्रांना देश सोडण्यास मनाई

  • Share this:

नवी दिल्ली, 1 एप्रिल : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीनासाठी वाड्रा यांना 5 लाख रुपये रक्कम भरावी लागणार आहे. तसंच परवानगीशिवाय वाड्रा परदेशात जाऊ शकत नाहीत, असे आदेशही कोर्टानं दिले आहेत. सोबतच कोर्टानं वाड्रा यांना तपासामध्ये सहकार्य करण्याचे, पुराव्यांमध्ये छेडछाड न करण्याचे आणि साक्षीदारांवर दबाव न आणण्याचे निर्देशही दिले आहेत. यापूर्वी 28 मार्च रोजी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. ज्यामध्ये अंमलबजावणी संचालनालय रॉबर्ट वाड्रा यांना अंतरिम जामीन देण्यास विरोध केला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

2005 ते 2010 या पाच वर्षांत वाड्रा यांनी लंडनमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. या मालमत्ता खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी वाड्रा आणि त्यांचे सहकारी मनोज अरोरा यांच्या चौकशीत लाचखोरी आणि मालमत्ता खरेदी उघड झाल्याचे सक्तवसुली संचालनालयाचे म्हणणे होते. चार महिन्यांपूर्वी याप्रकरणी दिल्ली, बंगळुरूतील काही ठिकाणांवर आणि वाड्रा यांच्या दिल्लीतील कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता.

रॉबर्ट वाड्रांवरील अन्य आरोप

हरियाणातल्या गुडगावमधील जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. FIR मध्ये DLF ही कंपनी आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज यांचं नाव सामील आहे. सुरेंद्र शर्मा नावाच्या व्यक्तीनं याप्रकरणी एक FIR दाखल केली होती. 2007 मध्ये स्काईलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीनं शिकोहपूर गावात ओंकारेश्वर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून 3 एकर जमीन कवडीमोल दरानं विकत घेतली होती, अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे. रॉबर्ट वाड्रा या कंपनीचे संचालक आहेत. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी नियम धाब्यावर बसवत या जमिनीचा व्यापार केला होता, असाही आरोप करण्यात आला आहे.

वाचा अन्य बातम्या

वर्ध्याच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या 'हिंदू दहशतवाद' शब्दावरून पुन्हा सुरू झाली चर्चा

VIDEO: अखेर चार तासानंतर बिबट्याचं पिल्लू जेरबंद

काँग्रेसशी संबंधित 700 पेजेस फेसबुकने टाकली काढून, आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण

First published: April 1, 2019, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading