इस्रो शास्त्रज्ञाच्या निर्घृण खुनामागचं रहस्य उलगडलं; लॅब टेक्निशनबरोबरच होते समलिंगी संबंध

इस्रो शास्त्रज्ञाच्या निर्घृण खुनामागचं रहस्य उलगडलं; लॅब टेक्निशनबरोबरच होते समलिंगी संबंध

लैंगिक संबधानंतर त्याने कुमार यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यातूनच त्याचं आणि कुमार यांचं भांडण झालं आणि त्या भांडणात श्रीनिवासने कुमार यांची हत्या केली.

  • Share this:

हैदराबाद 04 ऑक्टोंबर : इस्रोचे शास्त्रज्ञ एस. सुरेश कुमार यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. या घटनेने देशभर खळबळ उडाली होती. खूनाच्या पाठिमागे कोण आहे? याच्या शक्यताही व्यक्त करण्यात येत होत्या. हैदराबाद पोलिसांनी या खूनाचा छडा लावला असून त्यातून धक्कादायक माहिती पुढे आलीय. कुमार यांचे त्यांच्याच लॅब टेक्निशनबरोबर समलिंगी संबंध होते. त्यातून पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. आरोपीने हत्येची कबूली दिली असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. सुरेश कुमार हे इस्रोच्या National Remote Sensing Agency (NRSA) मध्ये शास्त्रज्ञ होते. त्यांचे त्यांच्याच लॅबमधल्या टेक्निशनबरोबर समलिंगी संबंध होते. जे श्रीनिवास असं त्याचं नावं आहे.

सोनिया आणि राहुल गांधी यांच्यात खरंच आहे का दुरावा?

पोलिसांनी श्रीनिवासला अटक केलीय. सुरेश कुमार हे हैदराबादमधल्या अमीरपेट भागात राहत होते. श्रीनिवास हा कुमार यांच्याकडे नियमित जात असे. गेल्या काही वर्षांपासून त्या दोघांचे संबंध होते. त्यामुळे श्रीनिवास हा कुमार यांच्याघरातच मुक्कामही करत असे. श्रीनिवास हा या संबंधांसाठी त्यांच्याकडून पैसे उकळत होता. या पैशाच्या बदल्यात त्याची या संबंधांना परवानगी होती असं स्पष्ट होत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

धनंजय आणि पंकजा मुंडे यांची संपत्ती जाहीर, कुणाचं पारडं आहे जड?

ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी श्रीनिवास हा कुमार यांच्या घरी मुक्कामी होता. लैंगिक संबधानंतर त्याने कुमार यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यातूनच त्याचं आणि कुमार यांचं भांडण झालं आणि त्या भांडणात श्रीनिवासने कुमार यांची हत्या केली. कुमार यांच्याकडे असलेलं सोन, अंगढी आणि 10 हजार रुपये असा ऐवजही त्याने लंपास केला होता.

प्रकाश आंबेडकरांना फोन केला होता पण आमचं जमलं नाही - ओवेसी

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक पुरावे जमा केले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी चौकशीनंतर श्रीनिवासला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 4, 2019, 9:46 PM IST
Tags: isro

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading