हैदराबाद, 24 फेब्रुवारी : आई आणि मुलाचं नात सगळ्यात पवित्र असतं. पण याच नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या पोटच्य़ा गोळ्य़ाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने आईला तिच्या अनैतिक संबंधाविषयी वडिलांना नाव सांगणार अशी धमकी दिल्यामुळे आईने त्याची निर्घृण हत्या केली आहे.
एका आईने आपल्या नऊ वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी संशयावरून आईकडे विचारपूस केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. दरम्यान, या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या नलगोंडा जिल्ह्यात, घरात एका नऊ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. टॉवेलने मुलाची गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांना तपासात आढळले. आईने हत्येचा संशय व्यक्त केला असता पोलिसांनी खून प्रकरणाचा तपास सुरू केला आणि घरातील सदस्यांची विचारपूस केली.
इतर बातम्या - Sridevi Death Anniversary : आईच्या आठवणीत भावूक झाली जान्हवी कपूर
पोलिसांना तपासणीदरम्यान आढळले की, महिलेचा नवरा बोरवेल कंपनीत नोकरी करतो आणि अनेकदा कामाच्या संबंधात घराबाहेर राहतो. पतीने आपल्या पत्नीचे एखाद्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली. यासंदर्भात पोलिसांनी महिलेची विचारपूस केली असता माझ्या मुलाला याबद्दल समजलं होतं आणि वडिलांना याबद्दल सांगण्याची धमकी देत असल्याचे तिने सांगितले. संतप्त महिलेने टॉवेलनेच्या आपल्या मुलाची हत्या केली. पोलिसांनी महिलेविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलं आहे.
इतर बातम्या - देशभरात NIAचे 20 ठिकाणी छापे, ISISचं रॅकेट उद्धवस्त
पोलिसांनी घटनास्थळावरून मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णलायात पाठवण्यात आला. तर मुलाच्या वडिलांना एकाच वेळी दोन धक्के सहन करावे लागले. पत्नीचे अनैतिक संबंध आणि चिमुरड्या त्याच्या आईने केलेली हत्या. या सगळ्यामुळे संपूर्ण गावातही शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या - 'आम्ही कराचीतल्या दर्ग्याबाहेर दाऊद इब्राहिमला ठार करण्यासाठी वाट बघत होतो, पण..