महात्मा गांधी , विवेकानंद ,डॉ आंबेडकर यांनी सांगितलं तेच हिंदुत्व- मोहन भागवत

आज हिंदुत्वाकडे संघाकडे मोठ्या प्रमाणात तरूण आकर्षित होत आहेत असंही त्यांना पांचजन्य मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2018 05:48 PM IST

महात्मा गांधी , विवेकानंद ,डॉ आंबेडकर यांनी सांगितलं तेच  हिंदुत्व- मोहन भागवत

20 मार्च: राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंद यांनी जे सांगितलं तेच खरं हिंदुत्व आहे अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे. तसंच संघाचं हिंदुत्व या  सगळ्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं नाही असंही ते म्हणाले.

आज  हिंदुत्वाकडे संघाकडे मोठ्या प्रमाणात तरूण आकर्षित होत आहेत असंही त्यांना पांचजन्य मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. आज हिंदुत्वाकडे तरूण वळू नये म्हणून हिंदुत्वाची बदनामी केली जाते आहे. तोडून मोडून हिंदुत्वाच्या संकल्पना सांगितल्या जात आहेत .तसंच संघाकडे वळणाऱ्या युवकांना चांगल्याप्रकारे तयार करू असंही ते म्हणाले.   आपला  सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे असंही त्यांनी सांगितलं.महात्मा गांधी ,डॉ  बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंदांसोबत सुभाषचंद्र बोसांचं हिंदुत्वच खरं  आहे असं त्यांनी सांगितलं.

मोहन भागवतांनी याआधीही अशी अनेक विधान केली आहेत. याआधी संघ तीन दिवसात लष्कर तयार करू शकतं असं विधानही त्यांनी आपल्या एका भाषणात केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...