S M L
Football World Cup 2018

मी राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच नाही - मोहन भागवत

Sonali Deshpande | Updated On: Mar 29, 2017 04:00 PM IST

मी राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच नाही - मोहन भागवत

29 मार्च : मी राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत राष्ट्रपतीपदाबाबतच्या चर्चेला संघ स्वयंसेवक मोहन भागवत यांनी पूर्णविराम दिलाय.  शर्यतीत असणं ही मनोरंजक गोष्ट  असल्याचंही ते म्हणालेत. या तर प्रसार माध्यमांनी रचलेल्या बातम्या आहेत,नाव आलं तरी मी स्वीकारणार नाही, असंही ते म्हणालेत.

आम्ही स्वयंसेवक आहोत त्यामुळे अशा पदांपासून दूर रहातो, राजकारणाचा दरवाजा बंद केला आहे, असंही भागवत यांनी नागपूरमध्ये स्पष्ट केलंय.

मध्यंतरी मोहन भागवत यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी चर्चा होती. शिवसेनेनंही त्याला पाठिंबा दर्शवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2017 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close