स्वयंसेवक मोदी आणि पंतप्रधान मोदी एकसारखेच -मोहन भागवत

"कर्तृत्व संपन्न,प्रतिभावान नेत्यांचं चरित्र लिहलं जातं कारण त्यातून प्रेरणा मिळतं असते "

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2017 04:22 PM IST

स्वयंसेवक मोदी आणि पंतप्रधान मोदी एकसारखेच -मोहन भागवत

12 जुलै : नरेंद्र मोदी हे स्वयंसेवक आहे हे आम्हाला माहीत आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि देशाचे पंतप्रधान पण त्यांचा प्रवासही आजही तसाच आहे अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोडकौतुक केलं.

बिंदेश्वर पाठक लिखित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल बुक "दी मेकिंग ऑफ लेंजंड' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी  मोहन भागवत आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला आणि विश्व हिंदू परिषदेनी सरकारवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भागवत नक्की बोलतील असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण तसं काही झालं नाही.

भागवतांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. कर्तृत्व संपन्न,प्रतिभावान नेत्यांचं चरित्र लिहलं जातं कारण त्यातून प्रेरणा मिळतं असते म्हणत मोहन भागवत यांनी अशी पंतप्रधान मोदींची स्तुती केलीय.

तसंच नरेंद्र मोदी हे स्वयंसेवक आहे हे आम्हाला माहीत आहे. पण जगात लोकांना एवढा वेळ नाहीये की मोदींना ओळखलं पाहिजे. खरंतर मोदी यांच्याकडे पाहिलं पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा प्रवासाबद्दल चर्चा होत आहे. पण मोदी तेव्हाही तसे होते आणि आजही तसेच आहे असंही भागवत म्हणाले.

Loading...

विशेष म्हणजे, मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात भागवतांनी पहिल्यांदा मोदींवर भाषण दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...