मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मोहन भागवत घाबरतात'; सरसंघचालकांच्या विधानावरुन राहुल गांधींचा घेराव

'मोहन भागवत घाबरतात'; सरसंघचालकांच्या विधानावरुन राहुल गांधींचा घेराव

आज विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत आरएसएस कार्यकर्तांना संबोधित करताना म्हणाले...

आज विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत आरएसएस कार्यकर्तांना संबोधित करताना म्हणाले...

आज विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत आरएसएस कार्यकर्तांना संबोधित करताना म्हणाले...

    नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी चीनबाबत केलेल्या विधानावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोहन भागवत यांना सर्व सत्य माहीत आहे. मात्र याचा सामना करायला ते घाबरतात. सत्य हे आहे की, चीनने आपली जमिन हस्तगत केली आहे. आज विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएस कार्यकर्तांना संबोधित करताना चीनबाबत विधान केलं. सरसंघचालक म्हणाले की, संपूर्ण जगाने पाहिलं की कशा प्रकारे चीन भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करीत आहे. चीनचा विस्तारवादी व्यवहार सर्वांना माहीत आहे. चीनचा तायवान, व्हिएतनाम, यूएस, जपान आणि भारत या देशांसोबत तणाव आहे. मात्र भारताच्या कारवाईमुळे चीन घाबरला आहे. राहुल गांधींनी केलं हे ट्विट आरएसएस प्रमुखांच्या विधानावर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संघ आणि केंद्र सरकारावर जोरदार हल्ला केला. राहुल गांधींनी ट्विट केलं आहे की, खरं तर भागवतांना सत्य माहीत आहे. मात्र ते याचा सामना करायला घाबरतात. सत्य हे आहे की चीनने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे. आणि भारत सरकार आणि आरएसएसने याची परवानगी दिली आहे. चीनला धडा मिळाला, मात्र लक्ष ठेवावं लागेल यापूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे सैन्याच्या पराक्रमावर म्हणाले की, सैन्याची अतुट देशभक्ती आणि अदम्य धैर्य आमच्या शासनकर्त्यांचा स्वाभिमान, भारतीयांची दुर्दम्य नीती-धैर्याचा परिचय चीनला पहिल्यांदा झाला आहे. यंदा भारताने ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली, त्यामुळे चीन घाबरला आहे. चीनला जबरदस्त धक्का मिळाला आहे, कारण भारत धैर्याने उभा आहे. मात्र यानंतर आपण दुर्लक्ष करू चालणार नाही. अशा संकटांकडे लक्ष ठेवायला हवं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: India china, Rahul gandhi, Rss mohan bhagwat

    पुढील बातम्या