कलेक्टरची परवानगी नसतानाही मोहन भागवतांनी केरळातल्या शाळेत केलं ध्वजारोहण

कलेक्टरची परवानगी नसतानाही मोहन भागवतांनी केरळातल्या शाळेत केलं ध्वजारोहण

कलेक्टरने एक मेमो काढला होता ज्यात म्हटलं होतं की कुठल्याही सरकारी शाळेत किंवा अनुदानित शाळेत कोणताही नेता ध्वजारोहण करू शकत नाही

  • Share this:

पलक्कड, 15 ऑगस्ट: केरळातील पलक्कडच्या जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेत ध्वजारोहण केलंय.

केरळाच्या पलक्कड जिल्ह्याच्या प्रशासनाने कुठल्याही नेत्याला सरकारी किंवा सरकारी अनुदान असलेल्या शाळांमध्ये तिरंगा फडकवण्यास परवानगी दिली नव्हती. येथील कलेक्टरने एक मेमो काढला होता ज्यात म्हटलं होतं की कुठल्याही सरकारी शाळेत किंवा अनुदानित शाळेत कोणताही नेता ध्वजारोहण करू शकत नाही. शाळेतील शिक्षक किंवा एखादा योग्य प्रतिनिधीच ध्वजारोहण करू शकतो.

पण या मेमोकडे स्थानिक भाजपने गरजेचा नसल्याचं म्हणत मोहन भागवतांच्या हस्ते एका शाळेत ध्वजारोहण करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज सकाळी मोहन भागवतांनी तिरंगा फडकवलाही. शाळांमध्ये कोणीही ध्वजारोहण करू शकतं असा दावा बीजेपी आणि आर.एस.एसने केला आहे.

First published: August 15, 2017, 1:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading