आजपासून संघाची व्याख्यानमाला, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष

आजपासून संघाची व्याख्यानमाला, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष

दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आजपासून तीन दिवस एका व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. या तीन दिवसांच्या व्याख्यानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं तीन टप्प्यात भाषण होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आजपासून तीन दिवस एका व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. या तीन दिवसांच्या व्याख्यानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं तीन टप्प्यात भाषण होणार आहे. या तीन भाषणांचा विषय एकच आहे, भविष्य का भारत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टिकोन.रा. स्व. संघाच्या इतिहासात सरसंघचालकांच्या व्याख्यानांचं अशा पद्धतीने आयोजन करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार सत्तेत आल्यापासून सरसंघचालक मोहन भागवत यांचं दसऱ्याचं भाषण चर्चेचा विषय असतो. सरसंघचालक सरकारबद्दल काय बोलतात, मोदींबद्दल काय बोलतात याची माध्यमांना उत्सुकता असते. पण यावेळी पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत तीन व्याख्यानांच्या रूपात भारताचं भविष्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याबद्दल आपले विचार व्यक्त करणार आहेत. 2015 मधल्या मोहन भागवत यांच्या एका भाषणाचा संदर्भ घेतला तर या तीन दिवसांच्या भाषण मालिकेत काय असू शकतं याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

यापूर्वी संघाचे पूर्व सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांनी केलेली काही भाषणं चांगलीच गाजली होती. त्या दोन्ही वेळची भाषणं प्रामुख्याने सामाजिक अभिसरणाबद्दल होती. वर्षभरात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, संघ आणि हिंदुत्वाबद्दलचं वाढत असलेलं आकर्षण आणि प्रभाव, पुढच्या 7 वर्षात संघ शंभरीत पोहोचणार असल्याने सरसंघचालकांच्या या भाषणांना विशेष महत्त्व आहे.

दिल्लीत होत असलेल्या या तीन दिवसांच्या भाषण मालिकेसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आमंत्रण देणार का नाही याबद्दल मोठी उत्सुकता होती. पण राहुल यांना बोलावणार नसल्याचं संघाने स्पष्ट केलं.   या तीन व्याख्यानांच्या मालकेसाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. तीन व्याख्यानांच्या नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. या तीन व्याख्यानांच्या मालिकेत सरसंघचालक राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कोणकोणत्या विषयावर मतं मांडतात हे पाहणं  औत्सुक्याचं आहे.

VIDEO : 'दगडूशेठ'चा श्रीगणेशा; तृतीयपंथीयांना मिळाला आरतीचा मान

First published: September 17, 2018, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading