कराचीहून आले मोदींचे सीप्लेन; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

कराचीहून आले मोदींचे सीप्लेन; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

एन181केQ या रजिस्ट्रेशन नंबरच्या या विमानाचे पायलटही विदेशीच होते. 3 डिसेंबरला हे प्लेन कराचीला गेलं होतं. मग कराचीहून मुंबईला आलं. 11 डिसेंबरला हे विमान अहमदाबादला पोचलं.

  • Share this:

13 डिसेंबर: एकीकडे पंतप्रधानांनी सीप्लेनमधून प्रवास केला म्हणून नवा वाद उपस्थित झाला आहे तर दुसरीकडे ज्या सीप्लेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवास केला ते विमान व्हाया कराची भारतात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे मोदींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सीप्लेनमधून प्रवास करत मोदींनी गुजरातमध्ये प्रचार केला. सीप्लेनमधून प्रवास करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.  पण UK.Flightaware.com या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान भारतात व्हाया कराची आलं होतं. एन181केQ या रजिस्ट्रेशन नंबरच्या या विमानाचे पायलटही विदेशीच होते. 3 डिसेंबरला हे प्लेन कराचीला गेलं होतं. मग कराचीहून  मुंबईला आलं. 11 डिसेंबरला  हे विमान अहमदाबादला पोचलं.

तसंच पंतप्रधानांची सुरक्षा लक्षात घेता ते कायम दोन इंजिन असलेल्या विमानातून  प्रवास करतात. पण या विमानाला मात्र एकच इंजिन होतं. यामुळे काँग्रेसनेसुद्धा या प्लेनचा विरोध केला आहे. तेलंगणा काँग्रेसने तर पंतप्रधानांसाठी असं प्लेन का मागवलं गेलं अशा आशयाचं ट्विटदेखील केलं आहे.

 

First published: December 13, 2017, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading