जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन आणा, मोदींचा मुख्यमंत्री असतानाचा व्हिडिओ व्हायरल

गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका भाषणात मोदी म्हणाले की, जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन आणा. मोदींचा मुख्यमंत्री असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. आज मोदी बुलेट ट्रेनचं समर्थन करतायत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2017 10:08 PM IST

जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन आणा, मोदींचा मुख्यमंत्री असतानाचा व्हिडिओ व्हायरल

01 आॅक्टोबर : बुलेट ट्रेनवरून राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. त्यात मोदींचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे भाजपवर आणखीनच टीका होऊ लागलीये.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका भाषणात मोदी म्हणाले की, जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन आणा. मोदींचा मुख्यमंत्री असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय.   आज मोदी बुलेट ट्रेनचं समर्थन करतायत. त्याने रोजगार वाढेल म्हणतायत. पण 2013मध्ये ते काही वेगळंच बोलले होते. भाजप मात्र बुलेट ट्रेनवर ठाम आहे.

लोकलच्या गर्दीत चिरडणाऱ्यांच्या जखमेवर बुलेट ट्रेनचं मलम काम करायचं नाही महाराजा. भाजपच्या नेत्यांना हे जितक्या लवकर लक्षात येईल तितके त्यांच्यासाठीच उत्तम. बाकी कसं आणि काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.

हा पहा मोदींचा तो वादग्रस्त व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 10:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...