नवी दिल्ली, 19 मे : लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथचा दौरा केला. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी तेथील गुहेत ध्यानधारणा देखील केली. पण, त्या गुहेमध्ये आता तुम्हाला देखील ध्यानधारणा करता येणार आहे. विश्वास नाही बसत? त्यासाठी केवळ 999 रूपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. साडेबारा हजार फुट उंचीवर असलेल्या या गुहेत आता 999 रूपये मोजून तुम्हाला देखील ध्यानधारणा करता येणार आहे.
कशी आहे गुहा
ज्या गुहेत मोदींनी ध्यानधारणा केली ती गुहा जास्त जुनी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ विकास धामची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गुहा तयार करण्याचे निर्देश दिले होते. नरेंद्र मोदींनी ज्या गुहेत ध्यानधारणा केली त्या गुहेसाठी दिवसासाठी 999 रुपये मोजावे लागतात. 12250 फूट उंचीवर तयार करण्यात आलेली गुहा नैसर्गिक नाही. ही गुहा ध्यान आणि अध्यात्मिक शांततेसाठी तयार करण्यात आली आहे. गुहेत स्वच्छतागृह, वीज आणि टेलिफोनचीही सुविधा देखील उपलब्ध आहे.
गुहेतून चहा, नाष्टा, जेवण मागवण्याची सोय आहे. गढवाल मंडल विकास निगमच्या वेबसाईटवर जाऊन गुफेचं बुकिंग करता येतं. त्यामुळे तुम्हाला देखील केदारनाथला जाऊन गुहेत ध्यानधारणा करणं शक्य होणार आहे.
VIDEO: पाटणामध्ये तुफान राडा, तेजप्रताप यादव यांच्या गाडीची तोडफोड