पंतप्रधानांच्या 'एग्झाम वॉरियर्स' पुस्तकाचं प्रकाशन, तणावमुक्त परीक्षेचा दिला मंत्र

पंतप्रधानांच्या 'एग्झाम वॉरियर्स' पुस्तकाचं प्रकाशन, तणावमुक्त परीक्षेचा दिला मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या एक्झाम वाॅरियर्स पुस्तकाचं प्रकाशन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांच्या हस्ते झालं.

  • Share this:

03 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या एक्झाम वाॅरियर्स पुस्तकाचं प्रकाशन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांच्या हस्ते झालं. पंतप्रधानांचं हे पाचवं पुस्तक. परीक्षेत तणावमुक्त कसं राहावं, हे सांगणारं हे पुस्तक आहे.

208पानांच्या पुस्तकात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. त्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे अभ्यास करता येतील, यासाठी जागाही सोडलीय. यात मुलांना व्यावहारिक सल्ले दिलेत. आपण विद्यार्थी दशेत काय करायचो हेही पंतप्रधानांनी मांडलंय.  आपले अनुभव सांगत मोदींनी फक्त पुस्तकी परीक्षा नाही, तर जीवनातल्या परीक्षेत कसं उत्तीर्ण व्हायचं, हेही सांगितलंय.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुषमा स्वराज यांनी परीक्षेऐवजी निवडणुकीला सामोरं कसं जावं असं म्हटल्यानं एकच हशा पिकला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2018 09:51 PM IST

ताज्या बातम्या