News18 Lokmat

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस;देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबईतही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आज कार्यक्रम होणार आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2017 11:09 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस;देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

17 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. हा दिवस देशभरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात साजरा करत आहेत. हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त  आपली  आई हिराबैनची  भेट  घेतली. तिचा आशीर्वादही घेतला.

मुंबईतही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आज  कार्यक्रम होणार आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. तसेच खादीला प्रोत्साहन देण्यासाठी, खादीच्या एक किलोमीटर लांब कापडावर, नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणारे संदेश वांद्रे पश्चिम इथल्या कार्टर रोडवर लिहिले जाणार आहेत. भाजपने आखून दिलेल्या या कार्यक्रमात, मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

याशिवाय पंतप्रधान मोदीही आज श्रमदान करण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 10:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...