नवी दिल्ली, 6 जुलै : आपल्या वाढदिवशी (Birthday) आपल्याला सर्वांकडून शुभेच्छा मिळाव्यात, अशी अनेकांची इच्छा असते. विशेषतः एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून शुभेच्छा मिळाल्या, तर अनेकांना आनंद होतो. काहीजण तर सेलेब्रिटींकडून शुभेच्छा मिळाव्यात, यासाठी वेगवेगळे प्रयत्नही करत असतात. ट्विटरवर (Tweeter) डेक्स्ट्रो (Dextro) नावाच्या एका हँडलवरून तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आपल्याला शुभेच्छा द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आणि विशेष म्हणजे ती पूर्णदेखील झाली.
ट्विटरवर डेक्स्ट्रो नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या मित्रानं अजित नावाच्या त्याच्या मित्रानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर डेक्ट्रो म्हणाला की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा द्याव्यात, अशी आपली इच्छा आहे. तसं झालं तर डेक्स्ट्रोदिवस सफल झाल्याचा आनंद आपल्याला मिळेल. आपली ही इच्छा पूर्ण होईल, अशी डेक्स्ट्रोनं कदाचित अपेक्षाही केली नसेल, मात्र प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींनी त्याला शुभेच्छा देऊन आश्चर्याचा धक्का दिला.
Happy Birthday...or as you are describing it - Dextrodiwas... :)
Have a great year ahead. https://t.co/X0Z5DrdMQ1 — Narendra Modi (@narendramodi) July 6, 2021
काय होतं ट्विट?
पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवरून डेक्स्ट्रोला शुभेच्छांचा मेसेज करण्यात आला. जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतानाच डेक्स्ट्रोदिवसाच्या शुभेच्छा, असंही या ट्विटमध्ये लिहिण्यात आल्यामुळं अनेक नेटिझन्सच्या चेहऱ्यावर स्मित अवतरलं. डेक्स्ट्रोचा आनंद तर गगनात मावत नसेल, असं अनेक नेटिझन्सनी या ट्विटखाली लिहिलं आणि डेक्स्ट्रोवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला.
हे वाचा -Russia Plane Crash: 28 प्रवाशांसह विमान झालं गायब; अपघातामागे ‘हे’ कारण?
मंत्रिमंडळ विस्तार आणि डेक्स्ट्रो
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या धावपळीत व्यस्त असतानाही त्यांच्याकडून या शुभेच्छा आल्यामुळे सर्वांनाच त्यांचं कौतुक वाटलं. अर्थात पंतप्रधानांचं ट्विटर हँडल हाताळण्याचं काम वेगळे लोक करत असतात, ही तांत्रिक माहिती खरी असली, तरी सामान्यांसाठी देशाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा देणं, ही गोष्ट लाखमोलाची असते. त्यामुळं आजवरच्या अनेक वाढदिवसांपैकी डेक्स्ट्रोचा हा वाढदिवस यादगार झाला असणार, यात शंकाच नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Tweet