मोदी करणार 'सी-प्लेन'ने प्रचार

मोदी सी प्लेननं अहमदाबादच्या साबरमती नदीत उतरतील, तिथून ते मेहसाना जिल्ह्यातील धारोई धरणात पोहोचतील. त्यानंतर ते अंबाजी मंदिरात दर्शन घेतील आणि पुन्हा त्याच मार्गानं परत अहमदाबादला परततील.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2017 09:55 AM IST

मोदी करणार 'सी-प्लेन'ने प्रचार

12 डिसेंबर: गुजरात निवडणुकीचा दुस-या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सी प्लेननं प्रवास करत प्रचार करणार आहेत. सी प्लेनने प्रचार करणारे ते पहिले भारतीय नागरिक ठरणार आहेत.

मोदी  सी प्लेननं अहमदाबादच्या साबरमती नदीत उतरतील, तिथून ते मेहसाना जिल्ह्यातील धारोई धरणात पोहोचतील. त्यानंतर ते अंबाजी मंदिरात दर्शन घेतील आणि पुन्हा त्याच मार्गानं परत अहमदाबादला परततील.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पुरुषोत्तम रुपाला, खासदार परेश रावल, मनोज तिवारी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, प्रदेशाध्यक्ष जितू वागानी हे सर्वजण प्रचार करतील.

तर काॅंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल गांधीनगरमध्ये प्रचारसभा घेत भाजपवर हल्लाबोल केला. जर मोदींना काॅंग्रेस संपली असं वाटत असेल ते त्यांच्या भाषणाचा अर्धा वेळ काॅंग्रेसबद्दलच का बोलत आहेत असा खडा सवाल त्यांनी केला. कोणी काहीही म्हणोत राज्यात काॅंग्रेसचीच सत्ता येणार हे नक्की असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 09:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...