पंतप्रधानांचं भाषण ऐकण्याची सर्व विद्यापीठांना सक्ती; पश्चिम बंगालचा विरोध

पंतप्रधानांचं भाषण ऐकण्याची सर्व विद्यापीठांना सक्ती; पश्चिम बंगालचा विरोध

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी सोहळा आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणास 125 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १0.30 वाजता विज्ञान भवन इथे विद्यार्थी संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली,11सप्टेंबर: आज विज्ञान भवनमध्ये विद्यार्थी संमेलनात 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. हे भाषण प्रत्येक विद्यापीठात लाईव्ह दाखवायचे निर्देश युजीसीनं दिले आहेत.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी सोहळा आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणास 125 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १0.30 वाजता विज्ञान भवन इथे विद्यार्थी संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाची थीम यंग इंडिया, न्यू इंडिया अशी आहे. युजीसीनं पंतप्रधानांचं हे भाषण देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये लाईव्ह दाखवण्याचे निर्देश दिले असले तरी पश्चिम बंगालने मात्र या भाषण सक्तीला विरोध केला आहे.

First published: September 11, 2017, 8:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading