शपथविधी सोहळ्यात मंत्र्यांचं नाव पुकारणारे ते आहेत कोण?

शपथविधी सोहळ्यात मंत्र्यांचं नाव पुकारणारे ते आहेत कोण?

राष्ट्रपती भवनाच्या विशाल प्रांगणात जेव्हा मोदी सरकारच्या एक एक मंत्र्यांचं नाव पुकारलं जात होतं तेव्हा सगळ्यांचं लक्ष एका व्यक्तीकडे जात होतं. त्या व्यक्तीने क्रीम कलरचा सूट घातला होता. त्या त्या मंत्र्यांचं नाव पुकारल्यानंतर ते हळूच मागे जायचे. जोपर्यंत ते मंत्री शपथ घ्यायचे तोपर्यंत ते शांतपणे उभे राहायचे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : राष्ट्रपती भवनाच्या विशाल प्रांगणात जेव्हा मोदी सरकारच्या एक एक मंत्र्यांचं नाव पुकारलं जात होतं तेव्हा सगळ्यांचं लक्ष एका व्यक्तीकडे जात होतं. त्या व्यक्तीने क्रीम कलरचा सूट घातला होता. त्या त्या मंत्र्यांचं नाव पुकारल्यानंतर ते हळूच मागे जायचे. जोपर्यंत ते मंत्री शपथ घ्यायचे तोपर्यंत ते शांतपणे उभे राहायचे.

राष्ट्रपतींचे सचिव

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबद्दलची महत्त्वाची घोषणा करणारी ही व्यक्ती कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नव्या मंत्र्यांचं नाव पुकारणारे हे आहेत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव संजय कोठारी. ते 1978 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2016 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांची राष्ट्रपतींच्या सचिवपदी नियुक्ती झाली. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात संजय कोठारी यांच्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

कर्तव्यदक्ष अधिकारी

संजय कोठारी यांनी हरियाणा केडरचे अधिकारी म्हणून हरियाणामध्ये आणि केंद्रातही वेगवेगळ्या पदांवर काम केलं. त्यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली. संजय कोठारी जिथेजिथे जिल्हाधिकारी म्हणून गेले तिथेतिथे त्यांनी बेकायदेशीर कामांना चाप बसवला आणि आपल्या कर्तव्यदक्ष कारभाराची छाप उमटवली. संजय कोठारी यांचा प्रशासकीय अनुभव गाढा आहे. त्यामुळे त्यांच्यावर अशी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाते.

मोदींचा विश्वास

नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी आयएएस अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली. या बैठकीत संजय कोठारी यांच्या कार्यक्षमतेमुळे मोदींवर त्यांचा प्रभाव पडला. तेव्हापासून ते मोदींच्या विश्वासातले अधिकारी मानले जातात. त्यांनीच नव्या सरकारमध्ये कुणाचा समावेश होणार याची घोषणा केली.

=======================================================================================

VIDEO : ''मैं नरेंद्र दामोदरदास मोदी...'', अशी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

First published: May 30, 2019, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading