द्रमुक-काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाणीत 75 वर्षांच्या नरेंद्र मोदी समर्थकाचा मृत्यू

द्रमुक-काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाणीत 75 वर्षांच्या नरेंद्र मोदी समर्थकाचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 वर्षीय समर्थकाला कथित काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

  • Share this:

चेन्नई, 15 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 वर्षीय समर्थकाला कथित काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

तमिळनाडूत तंजावर इथे गोविंदराजन भाजप- अण्णा द्रमुक आघाडीचा प्रचार करत होते. त्या वेळी द्रमुक-काँग्रेस आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी गोविंदराजन यांना मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला.  हे 75 वर्षीय गृहस्थ अण्णा द्रमुकचे संस्थापक दिवंगत एम. जी. रामचंद्रन यांचे चाहते होते, असं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणी गोपिनाथ नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गोपिनाथ यांनी आपण द्रमुक- काँग्रेसचे समर्थक असल्याचं सांगितलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

तामिळनाडूत या निवडणुकीत सरळ लढती होणार आहेत. सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि भाजपने निवडणुकीपूर्वीच आघाडी केली आहे. अण्णा द्रमुक सुरुवातीपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होतेच. तमिळनाडूतला विरोधी पक्ष द्रमुक यांनी काँग्रेसशी संधान बांधलं आहे. या दोन्ही आघाड्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच झाल्यामुळे आता या दक्षिणेकडच्या राज्यात सरळ लढत होणार आहे.

VIDEO: आझम खान यांच्या 'खाकी अंडरवेअर' वक्तव्यावर काय म्हणाले रामदास आठवले?

First published: April 15, 2019, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading