'स्पीड ब्रेकर दीदीं'ना मोदींनी 'उद्दाम' म्हटल्यावर ममता बॅनर्जींनी दिलं 'हे' उत्तर

'स्पीड ब्रेकर दीदीं'ना मोदींनी 'उद्दाम' म्हटल्यावर ममता बॅनर्जींनी दिलं 'हे' उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातल्या शाब्दिक चकमकी सुरूच आहेत. ममतांनी उद्दामपणाने आपला फोन घेतला नाही, असं मोदींनी म्हटल्यावर ममतांनी त्यावर काय उत्तर दिलंय पाहा...

  • Share this:

कोलकाता, 6 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातल्या शाब्दिक चकमकी सुरूच आहेत. फानी चक्रीवादळासंदर्भात विचारपूस करण्यासाठी आपण केलेला फोन ममती दीदींनी घेतला नाही, असं मोदींनी जाहीर केल्यामुळे संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी आम्ही त्यांचे नोकर नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या राज्याला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही, असंही बॅनर्जी यांनी म्हटलंय.

नरेंद्र मोदी यांनी तामलुक इथल्या प्रचार सभेत ममता बॅनर्जी यांचा चांगला समाचार घेतला. बॅनर्जींचा उल्लेख स्पीड ब्रेकर दीदी असा करताना त्यांनी सांगितलं की, त्या नैसर्गिक आपत्तीचंही राजकारण करत आहेत. "त्यांच्यातल्या उद्दामपणापणामुळे त्या माझ्याशी बोलल्या नाहीत. पंतप्रधान कार्यालयाचा फोन पाहून त्या उलट फोन करतील अशी आशा होती, पण त्यांनी केला नाही.  बंगालच्या नागरिकांच्या काळजीपोटी मी फोन केला होता. पण दीदींना तुमची किती काळजी आहे पाहा. पश्चिम बंगालचा विकास या अशा वृत्तीमुळे वेग घेत नाही", असं मोदी म्हणाले.

या आरोपांना उत्तर देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "फक्त प्रसिद्धीसाठी आणि सहानुभूतीसाठी मोदी अशी नाटकं करतात. मोदी इथे राजकीय सभेसाठी आलेले असताना मी त्यांना का भेटाव", असा सवालही त्यांनी केला.


‘राजीव गांधी मॉब लिंचर’; भाजप मित्रपक्षाच्या प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

VIDEO: राहुल गांधी गुंडगिरी करत आहेत - स्मृती इराणी

"मुख्यमंत्र्यांशिवाय मुख्य सचिव आणि इतर उच्च अधिकाऱ्यांच्या बैठका पंतप्रधान घेऊन कसे शकतात. हे नाटक बंगालमध्ये चालणार नाही. आम्हाला तुमची दया नकोय", असं प्रत्युत्तर ममता बॅनर्जी यांनी दिलं. पंतप्रधान कलाईकुंडा इथे उतरल्यानंतर बंगाल सरकारला बैठकीबद्दल सांगण्यात आलं, अशी तक्रार करत "आम्ही काही तुमचे नोकर नाही", असं ममता गरजल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फानी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर ओडिशातल्या परिस्थितीबद्दल माहिती घेतली. तशीच ते पश्चिम बंगालबद्दल घेऊ इच्छित होते. सोमवारी केंद्र सरकारने राज्य सरकारला रिव्ह्यू मीटिंगबद्दल कळवलं होतं, अशीही सूत्रांची माहिती आहे. पण राज्य सरकारने निवडणूक कार्यक्रमामुळे सरकारी अधिकारी व्यग्र असल्याचं उत्तर दिलं, त्यामुळे बैठक होऊ शकली नाही. पण बंगाल सरकारने अशा प्रकारे बैठकीबद्दल आधी काही कळवल्यात आलं नव्हतं, असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला या बैठकीची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, त्यामुळे बैठक नाकारण्याचा प्रश्न नव्हता, असं बॅनर्जी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.


VIDEO : 'जय श्रीराम'च्या घोषणांनी भडकल्या ममतादीदी; म्हणाल्या, 'निकालानंतर इथंच राहायचं आहे ना!'

SPECIAL REPORT : ममतादीदींच्या गडात कोण घालतंय धुडगूस?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडे चौकशी करण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी थेट राज्यपालांना वादळासंदर्भातल्या परिस्थितीविषयी विचारलं. मुख्यमंत्र्यांचं महत्त्व कमी दाखवण्यासाठी असं मुद्दाम करण्यात आल्याचा आरोप शनिवारी तृणमूल काँग्रेसने मोदींवर टीका केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 02:38 PM IST

ताज्या बातम्या