S M L

सरदार पटेल काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते तर काश्मीरचा प्रश्न चिघळला नसता- मोदी

यावेळी मोदी म्हणाले, सरदार पटेल काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते तर काश्मीरचा प्रश्न चिघळला नसता.

Sonali Deshpande | Updated On: Feb 7, 2018 02:21 PM IST

सरदार पटेल काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते तर काश्मीरचा प्रश्न चिघळला नसता- मोदी

07 फेब्रुवारी : प्रचंड गदारोळात पंतप्रधानांनी लोकसभेत दीड तास भाषण सुरू होतं. विरोधकांनी पंतप्रधान भाषणाला उभे राहिल्यावर एकच गोंधळ सुरू केला. यावेळी मोदी म्हणाले,  सरदार पटेल काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते तर काश्मीरचा प्रश्न चिघळला नसता. आपल्या भाषणात मोदींनी पंडित नेहरू, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली.

काय म्हणाले मोदी ?

- लोकशाही फक्त नेहरू आणि काँग्रेसनं नाही आणली, इतरांचंही योगदान

- काँग्रेसनं लोकशाहीच्या गोष्टी करूच नये.. कारण राजीव गांधींनी एका दलित मुख्यमंत्र्याला हटवलं होतं.

- सोनियांवरही बरसले मोदी, आत्मा की आवाज उठती है तो लोकतंत्र मर जाता है, असं मोदी म्हणाले

Loading...

- 'पटेल अध्यक्ष असते तर काश्मीरचा मुद्दा चिघळला नसता'

- तुम्ही काहीही काम केलं नाही म्हणून आज तुमच्या विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आलीये

- काँग्रेसनं एका कुटुंबाचे गाणे गाण्यात सगळा वेळ घालवला

- दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों

- काँग्रेसला लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा हक्क नाही

- माझा आवाज दाबू शकत नाही

- आज दिवसाला २२ किमी नॅशनल हायवे तयार होतायत

-१ लाखपेंक्षा जास्त ऑप्टिकल फायबर ग्रामीण भागात पोहचवली

- आम्ही 'आधार'मध्ये सुधारणा केल्या

- शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न

- युपीए सरकारच्या काळात बँकांचा बट्ट्याबोळ

- मनात येईल त्याला कर्ज दिलंच कसं

- गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 01:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close