पंतप्रधानांनी साधला पत्रकारांशी अनौपचारिक संवाद

पंतप्रधानांनी साधला पत्रकारांशी अनौपचारिक संवाद

तसंच स्वच्छ भारत अभियानाला दिलेल्या प्रसिद्धीबद्दल त्यांनी मीडियाचं कौतूक केलं.तसंच माध्यमांच्या टीकेचा समाजावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असंही मोदी म्हणाले.

  • Share this:

28 ऑक्टोबर: आज भाजपचा दिपावली मिलनाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाला भाजप पक्षाध्यक्ष अमित शहांसोबत अनेक पत्रकारही उपस्थित होते. यावेळी मोदींनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.

भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच मीडियाच्या ताकदीचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं मीडिया अनेक विधायक कामं करू शकते असंही ते म्हणाले. तसंच स्वच्छ भारत अभियानाला दिलेल्या प्रसिद्धीबद्दल त्यांनी मीडियाचं कौतूक केलं.तसंच माध्यमांच्या टीकेचा समाजावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असंही मोदी म्हणाले. लोकशाही शेवटपर्यंत पोचवण्याचं काम माध्यमांचं आहे अशा आशयाचं वक्तव्यही पंतप्रधानांनी केलं.पत्रकार आणि राजकीय नेत्यांमध्ये पारदर्शकता आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच राजकीय पक्षात माणसं घेतानाही पारदर्शकता असायला हवी असंही मोदी म्हणाले.

First published: October 28, 2017, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading