पुरुलिया, 20 एप्रिल : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी वाराणसी आणि वडोदरामधून लढले होते. याही निवडणुकीत त्यांनी वाराणसीसोबतच पश्चिम बंगालमधून लढावं, असं आवाहन त्यांना कार्यकर्त्यांनी केलं. त्यावर उत्तर न देता पंतप्रधान फक्त हसले.
लोकसभा निवडणुकीसाठीच्या दोन टप्प्यांचं मतदान झालं आहे.आता तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान आहे. त्यासाठीच मोदींनी पश्चिम बंगालमधल्या पुरुलियामध्ये सभा घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना हे आवाहन केलं.
राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधल्या वायनाडमधून लढत आहेत. यावेळी त्यांना अमेठीमधून यशाची खात्री नसल्यामुळेच त्यांनी वायनाडच्या सुरक्षित मतदारसंघात अर्ज भरला, असा आरोप भाजपने केला होता. उत्तर प्रदेशात राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीमधून लढत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये जोरदार टक्कर
आता मोदींनी पश्चिम बंगालमधूनही लढावं, असं कार्यकर्ते म्हणत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होतेय. इथल्या सगळ्या जागा आम्ही जिंकू,असं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी म्हटलं होतं. पण या राज्यात भाजप जोरदार मुसंडी मारेल, असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे.
यूपीए किंवा एनडीए यापैकी कुणीच सरकार बनवू शकणार नाही, असा दावा करत ममतांनी, विरोधकच पंतप्रधान ठरवतील, असं म्हटलं होतं.त्यांचा हा दावा किती खरा ठरतो ते पाहावं लागेल. पण सध्यातरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त वाराणसीतूनच लढणार आहेत.
7 टप्प्यांत मतदान
पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान आहे. ममतांच्या या बालेकिल्ल्यात भाजप किती मुसंडी मारू शकतं हे 23 मे च्या निकालाच्या दिवशीच कळेल.
===============================================================================
VIDEO : त्यांनाच शहिदांचा दर्जा, साध्वीची 3 विधानं