कोरोनाविरोधात लढण्यासाठी मोदी-शहांचा मेगा प्लान, भाजप कार्यकर्ते 5 कोटी गरीबांच्या अन्नाची करणार सोय

कोरोनाविरोधात लढण्यासाठी मोदी-शहांचा मेगा प्लान, भाजप कार्यकर्ते 5 कोटी गरीबांच्या अन्नाची करणार सोय

भारतीय जनता पक्षातर्फे देशातील तब्बल 5 कोटी गरीबांना अन्न पुरवलं जाणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 24 मार्च रोजी कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले. यामध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे. मात्र यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहे. त्यांना दररोजचे अन्न मिळण्याची मारामार झाली आहे. या धर्तीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) एक मोठा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 1 कोटी भाजप कार्यकर्ता गरीब कुटुंबीयांना अन्न पुरविणार आहेत. यानुसार प्रत्येक कार्यकर्ता 5 गरजूंसाठी अन्न उपलब्ध करुन देईल. त्यानुसार देशभरातील तब्बल 5 कोटी जनतेची उपासमार थांबेल व त्यांना लॉकडाऊनमध्ये होणारा अन्नाचा त्रास पुढे होणार नाही. यासंदर्भातील काम सुरू झाले आहे. उद्या कार्यकर्त्यांना यासंदर्भातील सूचना करण्यात येतील. सीएनएन-न्यूज वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.

संबंधित - CORONA चा 'खरा' अर्थ सांगणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्याचं पंतप्रधानांकडून कौतुक

आज भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी यासंदर्भातील बैठकीचं मार्गदर्शन केलं. उद्यापासून यासंदर्भातील काम सुरू करण्यात येणार आहे. देशभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी घरात राहणे आवश्यक आहे. यासाठी एप्रिलच्या 21 तारखेपर्यंत मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. चीनमधील वुहानमधून पसरलेला कोरोना विषाणूने जगभरात आपले हात-पाय पसरले आहे. याचा सर्वात जास्त फटका इटलीला बसला आहे. येथे दिवसाला शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. ही परिस्थिती भारतात उद्भवू नये यासाठी सरकारी पातळीवर मोठे प्रयत्न केले जात आहेत.

First published: March 25, 2020, 9:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading