नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यासाठी हा आहे मोदी सरकारचा नवा प्लॅन

नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यासाठी हा आहे मोदी सरकारचा नवा प्लॅन

या लोकसभा निवडणुकीत नोकऱ्या आणि रोजगाराचा मुद्दा खूपच गाजला होता. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या मोदी सरकारचा भर जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यावर असणार आहे. हे सरकार आधीच्या 'स्किल इंडिया' या योजनेमध्ये मोठे बदल करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मे : या लोकसभा निवडणुकीत नोकऱ्या आणि रोजगाराचा मुद्दा खूपच गाजला होता. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या मोदी सरकारचा भर जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यावर असणार आहे. हे सरकार आधीच्या 'स्किल इंडिया' या योजनेमध्ये मोठे बदल करणार आहे.

'स्किल इंडिया'साठी वाढीव निधी

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.

100 दिवसांचा आर्थिक अजेंडा

मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

शेती उत्पादन वाढवण्यावर भर

या आर्थिक अजेंड्यामध्ये खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक, शेती उत्पादन वाढवण्यावर भर आणि रोजगार वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. विरोधकांनी या निवडणुकीत रोजगार कमी झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं पण लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मुद्द्यावरून जनतेने सरकारला नाकारलेलं नाही हेच लक्षात येतं.

नव्या सरकारसमोर आव्हान

भाजप आणि एनडीएला भारतातल्या मतदारांनी भरभरून मतं दिली.आता जनतेच्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करणार का ते पाहावं लागेल. खास करून रोजगाराच्या बाबतीत संधी निर्माण करणं हे नव्या सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.

===============================================================================

VIDEO कोण बिघडवतंय औरंगाबादची शांतता? पाहा स्पेशल रिपोर्ट

First published: May 27, 2019, 7:34 PM IST

ताज्या बातम्या