नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला, भाजपची 30 तारखेची जय्यत तयारी

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला गेले आहेत. ते आता पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतील. त्यानंतर राष्ट्रपती त्यांना सरकारस्थापनेचं आमंत्रण देणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 06:48 PM IST

नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला, भाजपची 30 तारखेची जय्यत तयारी

नवी दिल्ली, 24 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला गेले आहेत. ते आता पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतील. त्यानंतर राष्ट्रपती त्यांना सरकारस्थापनेचं आमंत्रण देणार आहेत.16 वी लोकसभा आता विसर्जित करण्यात आली आहे.

गुजरात आणि वाराणसीचा दौरा

नरेंद्र मोदी 30 मे ला पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे. त्याआधी मोदी वाराणसी आणि गुजरातचा दौरा करणार आहेत. 28 मे ला त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

अरुण जेटली गैरहजर

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीला माजी अर्थमंत्री अरुण जेटली मात्र उपस्थित नव्हते. प्रकृतीच्या कारणांमुळे ते या बैठकीला आले नाहीत. नव्या सरकारच्या खातेवाटपाची चर्चाही आता सुरू झाली आहे पण अजून याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

Loading...

राजीनाम्यांचा सिलसिला

'फिर एक बार मोदी सरकार' ही घोषणा खरी ठरल्यामुळे भाजपची सरकारस्थापनेची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचा सिलसिला सुरू झाला आहे.

उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष एच. के. पाटील आणि ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक यांनी पाठवलेले राजीनामे काँग्रेस हायकमांडकडे आले आहेत पण ते हायकमांडने ते नाकारले. त्याचवेळी अमेठीच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसची फक्त हाफ सेंच्युरी

आतापर्यंत आलेले आकडे पाहिले तर एनडीएला 351 जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला आहे. दुसरीकडे यूपीएला 92 जागा मिळाल्या. भाजपला 303 तर काँग्रेसला फक्त 50 जागा मिळाल्या. इतरांच्या खात्यात 102 जागा आहेत.

अमेठीही गेलं

भाजपने उत्तर प्रदेशात मायावती - अखिलेश यादव यांच्या महागठबंधनवर मात करून तिथे 80 पैकी 60 जागा जिंकल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या अमेठीच्या बालेकिल्ल्यातच पराभूत झाले. सोनिया गांधींना रायबरेलीमध्ये विजय मिळाला.

==============================================================================

VIDEO : क्लासला लागली आग, मुलींनी टाकल्या खिडकीतून उड्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...