दिवाळीच्या आधी मोदी सरकारने आणले ग्रीन फटाके, पर्यावरण रक्षणाचा संदेश

दिवाळीच्या आधी मोदी सरकारने आणले ग्रीन फटाके, पर्यावरण रक्षणाचा संदेश

फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण 100 टक्के कमी करता येत नाही पण या ग्रीन फटाक्यांमुळे 30 टक्क्यांनी तरी प्रदूषण कमी होतं. या फटाक्यांमध्ये धूळ शोषून घेण्याची क्षमता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : केंद्र सरकारने या दिवाळीसाठी खास ग्रीन फटाके आणले आहेत. यामध्ये पेन्सिल, चक्र, फुलबाजी, सुतळी बॉम्ब हे सगळं आहे. नेहमीच्या फटाक्यांपेक्षा या फटाक्यांमुळे 30 टक्के कमी प्रदूषण होतं. देशभरातल्या बाजारपेठेत हे ग्रीन फटाके मिळतील, असं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने फटाक्यांवर निर्बंध घातले होते. यानंतर या ग्रीन फटाक्यांचा विचार झाला. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने अशा प्रदूषण कमी करणाऱ्या फटाक्यांवर महत्त्वाचं संशोधन केलं.फटाके बनवणाऱ्या कंपन्यांनीही या प्रकारचे फटाके तयार करण्यासाठी सहमती दर्शवली. त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आला.

जगभरात फटाक्यांचं सगळ्यात जास्त उत्पादन चीनमध्ये होतं. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये एक हजार फटाके उत्पादक आहेत. त्यांची वर्षभराची उलाढाल 6 हजार कोटींमध्ये जाते.

(हेही वाचा : मतदानाआधी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने खळबळ ; धनंजय मुंडे, रोहित पवार फ्रंटफूटवर?)

मुघलांच्या काळापासून देशात फटाक्यांची आतषबाजी केली जाते, असं म्हणतात. गन पावडर भारतात नंतर आली. मग फटाक्यांमध्ये गन पावडरचा वापर होऊ लागला.

ग्रीन फटाक्यांत काय असतं ?

फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण 100 टक्के कमी करता येत नाही पण या ग्रीन फटाक्यांमुळे हे प्रदूषण कमी होतं.या फटाक्यांमध्ये धूळ शोषून घेण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर या फटाक्यांमधून होणारं उत्सर्जनही कमी आहे. या फटाक्यांतून पाण्याचे कण तयार होतील. यामुळे धूळ आणि प्रदूषणकारी घटक कमी व्हायला मदत होईल.

(हेही वाचा : दिवाळीच्या आधी आहे बँकांचा संप, पूर्ण करून घ्या राहिलेली कामं)

या ग्रीन फटाक्यांवर हिरवा स्टिकर आणि बारकोड असेल. हा बारकोड स्कॅन केला तर हे फटाके नेमके कुठे तयार झाले. त्यात कोणतं रसायन आहे याची माहिती मिळेल.

नेहमी मिळणाऱ्या फटाक्यांपेक्षा हे ग्रीन फटाके थोडे महाग आहेत पण पर्यावरण रक्षणासाठी असे फटाके विकत घेणं जास्त हिताचं आहे.

==========================================================================================

VIDEO : 'प्रफुल्ल पटेलांचे व्यवहार देशद्रोह्यासोबत कसे?', मुख्यमंत्र्यांचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 04:08 PM IST

ताज्या बातम्या