मोदी सरकारने घेतले 5 मोठे निर्णय, शेतकरी आणि सामान्य माणसांना दिवाळी भेट

मोदी सरकारने दिवाळीच्या आधी काही मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकरी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त खूशखबर मिळालीय.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 06:32 PM IST

मोदी सरकारने घेतले 5 मोठे निर्णय, शेतकरी आणि सामान्य माणसांना दिवाळी भेट

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : मोदी सरकारने दिवाळीच्या आधी काही मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकरी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

1. BSNL ला दिलासा

BSNL च्या 15 हजार कोटी रुपयांच्या रिव्हायव्हल प्लॅनला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मते, BSNL आणि MTNL बंद केलं जाणार नाही. त्याचबरोबर या कंपन्यांची विक्रीही केली जाणार नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक VRS पॅकेज दिलं जाणार आहे.

2. पेट्रोल रिटेलिंगचे नियम सोपे

पेट्रोल ट्रान्सपोर्ट मार्केटिंग गाइडलाइनन्समध्ये बदल झाले आहेत. पेट्रोलच्या किरकोळ विक्रीचे नियम सोपे करण्यात आले आहेत. यामुळे पेट्रोल पंप सुरू करण्याची संधी आहे. तुमच्याकडे जास्त पैसे नसतील आणि तुमच्या नावावर जमीन नसेल तर तुम्ही पेट्रोल पंप डिलरशिपसाठी अर्ज करू शकता.

Loading...

3. रब्बी पिकांसाठी MSP जाहीर

रब्बी पिकांसाठी MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमतीला मंजुरी मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, MSP मध्ये 85 रुपयांची वाढ झाली आहे. बाजरीच्या MSP मध्येही वाढ झाली आहे.

(हेही वाचा : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क)

4. दिल्लीकरांसाठी मोठी भेट

केंद्र सरकारने दिल्लीकरांना मोठी भेट दिली आहे. दिल्लीतल्या अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या 40 लाख लोकांना घराचा मालकी हक्क देण्यात येईल. दिल्लीमध्ये 1 हजार 797 अनधिकृत वसाहती आहेत.

5. केडर रिव्ह्यू

भारत - तिबेट सीमेवरच्या पोलिसांसाठी केडर रिव्ह्यू करण्यालाही सरकारने मंजुरी दिली आहे. हे काम 18 वर्षांपासून प्रलंबित आहे.

==============================================================================================

निकालाआधी मोदींप्रमाणे मुख्यमंत्रीही पोहोचले केदारनाथला, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...