विविधतेमध्ये एकता हे आमच्या शक्तीचं भांडार-पंतप्रधान

विविधतेमध्ये एकता हे आमच्या शक्तीचं भांडार-पंतप्रधान

दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात' मधून देशासी संवाद साधला.

  • Share this:

24सप्टेंबर: दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात' मधून देशासी संवाद साधला. आज मन की बातमध्ये विविधतेत एकता हा आमचा केवळ नारा नाही तर ते आमच्या अपार शक्तीचं भांडार आहे असं मोदी म्हणाले.

मोदींनी आज मन की बातमध्ये लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि लेफ्टनंट निधी दुबे यांचं अभिनंदन केलं. विविधतेत एकता हा आमचा केवळ नारा नाही तर ते आमच्या अपार शक्तीचं भंडार आहे. श्रीनगरच्या बिलाल दारनं दल सरोवरातला एका वर्षात बारा हजार किलो कचरा साफ केलाय. 18 वर्षाच्या बिलाल दारला श्रीनगर महानगरपालिकेचं ब्रॅन्ड अॅम्बॅसेडर म्हणून घोषित केलंय. स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाला मिळालेला उत्तम प्रतिसाद बघून चांगलं वाटल्याचं मोदींनी सांगितलं.

तसंच खादीचं जे अभियान चालवलंय, ते पुढे नेऊयात आणि आणि वाढवू या असंही मोदी म्हणाले. मन की बात देशवासीयांच्या मनाला भिडलेली आहे, त्यांच्या आशा- अपेक्षांशी जोडलेली आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

First published: September 24, 2017, 2:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading