काश्मीरचा प्रश्न गोळ्यांनी नाही, गळाभेटीनं सुटेल- पंतप्रधान

काश्मीरचा प्रश्न गोळ्यांनी नाही, गळाभेटीनं सुटेल- पंतप्रधान

मोदी म्हणाले, ' हे वर्ष स्वतंत्र भारतासाठी महत्त्वाचं आहे. या वर्षी भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी आपण मोठं परिवर्तन आणू शकतो. '

  • Share this:

15 आॅगस्ट : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आणि देशाला उद्देशून भाषण केलं. मोदींनी सुरुवातीलाच स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी गोरखपूरची दुर्घटना आणि हिमाचलमधली नैसर्गिक आपत्ती यावर खेद प्रकट केला.

मोदी म्हणाले, ' हे वर्ष स्वतंत्र भारतासाठी महत्त्वाचं आहे. या वर्षी भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी आपण मोठं परिवर्तन आणू शकतो. '

यावेळी पंतप्रधानांनी न्यू इंडियाचा नारा दिला. ते म्हणाले, 'नवीन भारताचा संकल्प 2022 पर्यंत पूर्ण करायचा आहे.जगात भारताची ताकद वाढतेय.दहशतवादविरोधातल्या लढाईत आम्ही एकटे नाही. जगातले अनेक देश भारताच्या पाठीशी आहेत. काश्मीरमधल्या सामान्य लोकांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'

मोदी पुढे म्हणाले, 'न गालीसे समस्या सुलझनेवाली है, न गोलीसे समस्या सुलझनेवाली है, गले लगानेसे समस्या सुलझनेवाली है' . दहशतवादाविरोधात अजिबात मवाळ भूमिका नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. काळ्या पैशांविरोधात लढाई सुरू राहील, असंही ते म्हणाले.

मोदींनी सांगितलं, देश प्रामाणिकपणाचा उत्सव साजरा करतोय. तरुण पिढी हे देशाचं भविष्य असल्याचं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2017 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading