31 डिसेंबर : तिहेरी तलाकविरोधातील विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या मुद्द्यावर जाहीर भाष्य केलंय. भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. मात्र तरीही गुलामगिरीच्या काही बेड्या आजही कायम होत्या. मुस्लिम महिलांनी तिहेरी तलाकविरोधात दीर्घ काळ लढा दिला. त्या लढ्याला आता यश आलंय, असं मोदींनी म्हटलंय.
केरळमधील एका कार्यक्रमाला मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं.त्यावेळी मोदींनी तिहेरी तलाकवर भाष्य केलं. त्याआधी मन की बात कार्यक्रमात मोदींनी देशाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच यावेळी प्रजासत्ताक दिनाला आशियातले 10 नेते हजर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा