S M L

आयुष्यात योगाचं महत्त्व मिठासारखं - पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यंदा लखनौमध्ये योग दिवस साजरा करत असून, उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मोदींनी स्वत: योगासनं केली.

Sonali Deshpande | Updated On: Jun 21, 2017 10:45 AM IST

आयुष्यात योगाचं महत्त्व मिठासारखं - पंतप्रधान

21 जून : 'आयुष्यात योग मिठासारखं असतं. मीठ थोडंच असतं, पण त्याच्याशिवाय काहीच रुचकर लागत नाही. तसंच आहे योगाचं महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात,' आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी हे जनतेला सांगितलं. लखनौच्या रमाबाई आंबेडकर मैदानात हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पंतप्रधान मोदी यंदा लखनौमध्ये योग दिवस साजरा करत असून, उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मोदींनी स्वत: योगासनं केली. फक्त शारीरिक तंदुरुस्ती नव्हे निरोगी मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. योगामुळे आरोग्याची खात्री मिळते. योगासनं करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही, असं मोदी म्हणाले. योग म्हणजे विनामूल्य आरोग्यविमा, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...

देशभरात योग दिवस साजरा करणाऱ्या सर्वांना मोदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. मुसळधार पाऊस कोसळल्यानंतरही मोठया संख्येने उपस्थित राहून योगदिन साजरा करण्याचा उत्साह दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी उपस्थितांचे आभार मानले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईकही योग दिनाला उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 10:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close