मोदी- पुतिन यांनी केलं 5 अब्ज डॉलरचं डील; रशियाचं अत्याधुनिक मिसाईल भारताला मिळणार

मोदी- पुतिन यांनी केलं 5 अब्ज डॉलरचं डील; रशियाचं अत्याधुनिक मिसाईल भारताला मिळणार

भारत दौऱ्यावर असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संरक्षण क्षेत्रातले महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करार झाले. थोड्याच वेळात हे दोन नेते एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : भारत दौऱ्यावर असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. अत्याधुनिक संरक्षण सज्जतेसाठी प्रसिद्ध असलेलं रशियाचं S - 400 मिसाईल भारतात आणण्याचा करारही यामध्ये झाला आहे.

भारत रशिया दरम्यान संरक्षण, अणुऊर्जा, अण्वस्त्र करार आणि अवकाश संशोधनासंदर्भात महत्त्वाचे करार झाल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात दोन्ही देशांचे नेते लवकरच एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत.

रशियाचं S- 400 क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडे आणण्यासाठी ५ अब्ज डॉलरचा करार दोन देशांमध्ये झाल्याचं समजतं.

मोदी आणि पुतिन दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये सकाळी भेटले. द्विपक्षीय संबंधांबरोबरच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

भारताचं अवकाश संशोधन केंद्र रशियात उभारलं जाणार आहे, अशी माहिती मिळतेय.

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन हे १९ व्या भारत- रशिया शिखर परिषदेसाठी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या दबावाचा भारत- रशिया द्विपक्षीय चर्चेवर परिणाम होणार नाही, असं क्रेमलिननं अगोदरच सांगितलं होतं. संरक्षण क्षेत्रातले मोठे करार या भेटीत अपेक्षित होते.

First published: October 5, 2018, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading