Fani Cyclone : मोदींकडून पटनायकांचं कौतुक; निकालानंतरची 'साखरपेरणी'?

Fani Cyclone : मोदींकडून पटनायकांचं कौतुक; निकालानंतरची 'साखरपेरणी'?

फानी चक्रीवादळानंतर ओडिशाची हवाई पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायकाचं कौतुक केलं.

  • Share this:

भुवनेश्वर, 06 मे : फानी चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. हवाई पाहणी दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची स्तुती केली आहे. फानी चक्रावादळाची कल्पना मिळाल्यानंतर नवीन पटनायक यांनी संकटावर मात करण्यासाठी उत्तम योजना आखली अशा शब्दात मोदींनी कौतुक केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्व परिस्थितीचा आढावा देखील घेतला. ज्यावेळी नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं तेव्हा नवीन पटनायक देखील त्याच ठिकाणी हजर होते. आपल्या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाला 1000 कोटींची मदत देखील जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांनी परस्परांवर टीका केली होती. दरम्यान, मोदींनी केलेल्या स्तुतीनंतर आता राजकीय वर्तुळात देखील नवीन चर्चांना सुरूवात झाली आहे.


CBSE बोर्ड दहावीचा निकाल जाहीर, रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा!


निकालानंतर राजकीय गणितं बदलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्तुतीचं आणि निवडणुकीच्या निकालाचा काही संबंध आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण, निकालानंतर आम्ही कुणालाही पाठिंबा देऊ असं विधान पटनायक यांनी केलं होतं. त्यामुळे गरज पडल्यास भाजप नवीन पटनायकांकडे पाठिंबा मागणार का? असा सवाल विचारला जात आहे.


‘राजीव गांधी मॉब लिंचर’; भाजप मित्रपक्षाच्या प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

फानीमध्ये 34 बळी

ओडिशामध्ये फानी चक्रावादळामध्ये 34 जणांचा बळी गेला. फानी दरम्यान जवळपास 12 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. शिवाय, हजारो सरकार कर्मचारी आणि स्वयंसेवक देखील यावेळी कामाला लागले होते.

ममता–मोदींमध्ये आरोप–प्रत्यारोप

पश्चिम बंगालला देखील फानी या चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण, ममता बॅनर्जी यांनी असा कोणताही फोन आला नव्हता असा दावा केला. तर पंतप्रधान कार्यालयाकडून फोन केल्याचा दावा करण्यात आला होता.


VIDEO: पुण्यात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या