सौगंध मुझे इस मिट्टी की...लतादीदींनी गायली पंतप्रधान नरेंद्र मोदींची कविता

सौगंध मुझे इस मिट्टी की...लतादीदींनी गायली पंतप्रधान नरेंद्र मोदींची कविता

सौगंध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींच्या या कवितेला लतादीदींनी आवाज दिला आहे. पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर मोदींनी राजस्थानमध्ये ही कविता सादर केली होती.

  • Share this:

पाकिस्तानमधल्या बालाकोटवरच्या हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी राजस्थानमधल्या सभेत एक कविता म्हणून दाखवली होती ...

सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा

मेरा वचन है भारत माँ को तेरा शीश नहीं झुकने दूंगा

मोदींची हीच कविता लतातदीदींच्या आवाजात संगीतबद्ध झाली आहे. लतादीदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या कवितेचा व्हिडिओही शेअर केला आहे.

मोदींनीही लतादीदींचे आभार मानले आहेत. लता मंगेशकर यांच्या ट्विटर पोस्टवर मोदींनी तेवढीच भावुक प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण मी ऐकत होते आणि या भाषणात त्यांनी सादर केलेली कविता मला भारतीय मनाचं प्रतीक वाटली. प्रत्येक भारतीयाच्या मनातली भावना मोदींनी या कवितेतून मांडली आहे, असंही लतादीदींनी म्हटलं आहे.

ही कविता रेकॉर्ड करून मी जवानांना आणि जनतेला समर्पित करत आहे, असं लतादीदींनी ट्विटरवर लिहिलं आहे.

याआधी, माजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्या कवितेला ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी यांनी आवाज दिला होता. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या कविताही त्यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. पण नरेंद्र मोदींच्या कवितेला लतादीदींचा दैवी आवाज लाभला आहे. मोदींची ही कविता ऐकून लतादीदींनी स्वत:हून या कवितेला प्रतिसाद दिला.

======================================================================================================================================================

VIDEO: ..आणि नातीने नाकारली शहा आजोबांची टोपी

First published: March 30, 2019, 7:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading