मोदी मोदी येस पापा... लालूंच्या मुलाची मोदींवर गोड शब्दांत टीका!

मोदी मोदी येस पापा... लालूंच्या मुलाची मोदींवर गोड शब्दांत टीका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेब आणि दुर्योधन असल्याची जहरी टीका विरोधक करत आहेत. पण त्याच वेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी मोदींना बालगीतांच्या रूपात टोले लगावले आहेत.

  • Share this:

पाटणा, 8 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेब आणि दुर्योधन असल्याची जहरी टीका विरोधक करत आहेत. पण त्याच वेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी मोदींना बालगीतांच्या रूपात टोले लगावले आहेत.

विकास, शेतकऱ्यांचे मुद्दे, महिलांची सुरक्षा आण बेरोजगारी या विषयांवर मोदी सरकारने काय काम केलं हाच प्रश्न त्यांनी जॉनी जॉनी येस पापा च्या तालात विचारला आहे.भविष्यामध्ये मोदीभक्तांनी ही कविता शिकून घ्यावी, असा सल्ला तेजस्वी यादव यांनी दिला आहे. विकास झाला का ? नो पापा, शेतकरी खूश झाले का ? नो पापा, असं म्हणत तुम्ही केवळ आश्नासनं दिली का, असंही त्यांनी विचारलं आहे.

बिहारमध्ये 12 मे ला सहाव्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे राष्ट्रीय जनता दल आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

23 मे ला भूकंप

लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी मोठा भूकंप येणार आहे, असा दावा तेजस्वी यादव यांनी केला. भाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये जोरदार मतभेद झाल्यामुळे नितिशकुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. पश्चिम बंगालप्रमाणेच इथेही सात टप्प्यांत मतदान होतं आहे.

=====================================================================================

VIDEO: 'आमच्या बोलण्यानं भूकंप येत असेल तर त्याला सामोरं जावं', राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 06:49 PM IST

ताज्या बातम्या