VIDEO : थायलंडमध्येही मोदी मोदी, पाहा काय घडलं बँकॉकमध्ये?

VIDEO : थायलंडमध्येही मोदी मोदी, पाहा काय घडलं बँकॉकमध्ये?

काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयाबद्दल मोदी म्हणाले, जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा त्याचा जगभरात त्याचा गजर केला जातो. मोदींच्या या विधानानंतर उपस्थित भारतीयांनी मोदी मोदी च्या घोषणा देत त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिलं.

  • Share this:

बँकॉक, 2 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत. टेक्सासमधल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमानंतर थायलंडमध्ये भारतीय समुदायासमोर मोदींनी भाषण केलं. भारत आणि थायलंडमध्ये हजारो वर्षांचे नातेसंबंध आहेत. या दोन देशांमध्ये संस्कृती आणि समृद्धीचा सेतू बांधला गेला आहे, असं मोदी म्हणाले.

भगवान रामाची मर्यादी आणि बुद्धाची करुणा हा आपला संयुक्त वारसा आहे. भारतीय जिथेजिथे राहतात तिथेतिथे त्यांच्यामधली भारतीयता टिकून राहते. जेव्हा भारतीयांची प्रशंसा होते त्यावेळी मला अभिमान वाटतो, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर भारतीय जिथेजिथे राहतात तिथून ते भारताच्या संपर्कात असतात याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

मोदींना स्टँडिंग ओव्हेशन

काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयाबद्दल मोदी म्हणाले, जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा त्याचा जगभरात त्याचा गजर केला जातो. मोदींच्या या विधानानंतर उपस्थित भारतीयांनी मोदी मोदी च्या घोषणा देत त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिलं. त्यावर मोदी म्हणाले, हा सन्मान भारताच्या खासदारांचा आणि संसदेचा आहे.

एखाद्या सरकारने पाच वर्षं काम केल्यानंतरही त्या सरकारला त्यापेक्षाही जास्त बहुमत मिळालं, असं भारतात 60 वर्षांनी झालं आहे. जे काम करतात त्यांच्याकडून लोक आणखी कामाची अपेक्षा ठेवतात, असंही मोदींनी सांगितलं.

========================================================================================

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 08:23 PM IST

ताज्या बातम्या