15 आॅगस्ट : लाल किल्ल्यावरचं भाषण संपवून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहान मुलांना बघून आपला ताफा थांबवला. आणि चिमुकल्यांमध्ये रमले. सुरक्षेचे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मोदींनी चिमुकल्यांसोबत गप्पा मारल्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताफा थांबवून गप्पा मारल्यानं बच्चे कंपनीही खूप खूश झाली.
काल कृष्णाष्टमी आणि आज दहीहंडी. त्यामुळे हे बालगोपाल कृष्णाच्या वेषात होते. मोदी अचानक थांबल्यामुळे सुरक्षा रक्षकांची मात्र तारांबळ उडाली.