‘मोदीजी, फाईल जळत असल्या तरी तुम्ही वाचणार नाही’

‘मोदीजी, फाईल जळत असल्या तरी तुम्ही वाचणार नाही’

आता इतक्या किरकोळ घटनेची बातमी कशी काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल: देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. घटना कोणतीही असो सत्ताधारी वा विरोधक या घटनेचा निवडणुकीशी संबंध जोडतात आणि टीका करण्याची संधी सोडत नाहीत. मंगळवारी राजधानी नवी दिल्लीतील शास्त्री भवन आग लागली. भवनातील कूलर आणि वीज तार यामुळे आग लागल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी आर.मीणा यांनी सांगितले. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण अग्निशमन दलाच्या 6-5 गाड्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आता इतक्या किरकोळ घटनेची बातमी कशी काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या किरकोळ आगीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटवर या आगीच्या वृत्ताचे ट्विट रिशेअर करत म्हटले आहे की, मोदीजी, फाईल जळत असल्या तरी तुम्ही वाचणार नाही. राहुल गांधी यांचा हा ट्विट आता व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप आणि PM मोदींवर सातत्याने जोरदार हल्ला चढवला आहे. राफेल पासून ते चौकीदार चोर है यावरून राहुल गांधींनी मोदींवर नेहमी टीका केली आहे. आता शास्त्री भवनातील आगीवरून त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

SPECIAL REPORT : 'प' पवारांचा आणि 'प' पंतप्रधानांचा, हे गणित जुळणार?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 09:51 PM IST

ताज्या बातम्या