PHOTOS राहुल गांधींची ओळख बदलण्यात 'हे' जॅकेट ठरतंय महत्त्वपूर्ण

2019 मध्ये त्यांचा पूर्ण नवा अवतार बघायला मिळणार आहे, असं काँग्रेस कार्यकर्ते सांगतात. त्यासाठीच जॅकेटही मोदींसारखं नको म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वेगळं ट्रेडमार्क जॅकेट घालणं पसंत केलंय का?

  • Share this:

लोकसभेचं नवीन वर्षातलं पहिलं सत्र वादळी ठरणार अशी अपेक्षा होती, कारण राफेलविषयी चर्चेत राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेतली होती.

राहुल गांधींचं ट्रेडमार्क बनलेलं हे जॅकेट घालून त्यांनी आक्रमकपणे भाषणाची सुरुवात केली. राहुल गांधींच्या याच जॅकेटची सध्या चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी स्वत:ला ग्रुम केलंय, हे कार्यकर्तेही मान्य करतात. 2019 मध्ये त्यांचा पूर्ण नवा अवतार बघायला मिळणार आहे. त्यासाठीच जॅकेटही मोदींसारखं नको म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वेगळं ट्रेडमार्क जॅकेट घालणं पसंत केलं, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

राहुल गांधींचं हे ट्रेडमार्क जॅकेट आता अनेक काँग्रेस नेत्यांच्या अंगावर दिसू लागलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख बनलेल्या मोदी जॅकेटची जादू गेल्या काही वर्षांत देशातच नाही जगभर पसरली होती आता मात्र राहुल गांधींची जादू चालणार असं त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर काँग्रेसने भाजपकडची ३ राज्य हिसकावली आणि अचानक राहुल गांधींचा करिश्मा जास्त चर्चेत आला. मोदी जॅकेटऐवजी राहुल जॅकेट बाजारात दिसलं तर आता आश्चर्य वाटायला नको.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेइन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं तेच ट्रेडमार्क जॅकेट भेट दिलं आणि कोरियन राष्ट्राध्यक्षांनीही स्वतः ट्वीट करून ते मिरवलंदेखील!

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र आता मोदी जॅकेटऐवजी हे राहुल ट्रेडमार्क जॅकेट प्रसिद्ध करण्याचा चंग बांधलेला दिसतोय.

काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते आणि राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदी नुकतेच निवड झालेले सचिन पायलट हेदेखील या राहुल स्टाइल जॅकेटमध्ये दिसताहेत.

राहुल गांधींचं हे लेदर हाफजॅकेट लोकांना आवडायला लागलंय आणि काँग्रेसचे इतर नेते याच स्टाईलचं जॅकेट वापरायला लागले आहेत.

राहुल गांधी यांचं जॅकेट वर्षभरापूर्वी जोरदार चर्चेत होतं. पण ती चर्चा भाजपनं घडवून आणली होती. राहुल गांधी यांच्या मेघालय दौऱ्याच्या वेळी त्यांनी घातलेलं हे जॅकेट 65 हजारांचं असल्याचं सांगत, एवढं महागडं जॅकेट वापरणाऱ्या राहुल यांच्यावर टीका झाली होती.

आता राजस्थानमध्ये भाजपचा सपशेल पराभव केल्यानंतर सचिन पायलट यांच्यासारख्या तरुण नेत्यानं अभिमानानं हे ट्रेडमार्क जॅकेट मिरवलं.

नरेंद्र मोदी यांची ओळख बनलेली फॅशन पुसून टाकायची म्हणून मुद्दाम राहुल गांधी या प्रकारचं थोडं वेगळं जॅकेट घालत आहेत, की हा त्यांचा नैसर्गिक चॉईस आहे माहीत नाही, पण राहुल ट्रेडमार्क जॅकेट लोकप्रिय होतंय हे नक्की

राजस्थान आणि मध्य प्रदेशसह छत्तीसगडही खिशाल टाकल्यानंतर राहुल गांधी यांचा आत्मविश्वास वाढल्याचं त्यांच्या देहबोलीवरून दिसत आहे.

राहुल गांधी यांची ही स्टाईल लगेचच इतर काँग्रेस नेते आत्मसात करताना दिसताहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेसुद्धा अगदी तशाच प्रकारच्या जॅकेटमध्ये निवडणुकांच्या वेळी दिसले.

अशोक चव्हाण यापूर्वी अशा प्रकारचं जॅकेट घालून औपचारिक कार्यक्रम किंवा सभा-समारंभांना फारसे दिसले नव्हते.

मोदी जॅकेटनंतर आता या राहुल जॅकेटचा ट्रेंड येणार का यासाठी कदाचित सहा महिन्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची वाट पाहावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या