अनुपस्थितीवरून मोदींनी खासदारांना खडसावलं

राज्यसभेत नवीन सभापती येणार असल्याने तुमचे आरामाचे दिवस गेले असा इशारा मोदींनी राज्यसभा खासदारांना दिला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2017 04:15 PM IST

अनुपस्थितीवरून मोदींनी खासदारांना खडसावलं

नवी दिल्ली, 10 आॅगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेतल्या गैरहजेरीवरून खासदारांना चांगलंच खडसावलं. राज्यसभेत नवीन सभापती येणार असल्याने तुमचे आरामाचे दिवस गेले असा इशारा मोदींनी राज्यसभा खासदारांना दिला.

खासदारांच्या अनुपस्थितीवरून खासदारांवर मोदी भडकले. तुमचं भाजपशिवाय अस्तित्व काही नाही असा दम मोदींनी खासदारांना भरला. तुम्हाला वारंवार याविषयी सूचना करून तुम्ही तेच करत असाल तर2019 मध्ये याचा विचार होईल असंही नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

व्हिप काय आहे, सारखा सारखा व्हिप का काढावा लागतोय. तुम्हाला हजेरी लावण्यास वारंवार का सांगावं लागतंय. आता ज्या खासदारांना जे करायचं आहे ते त्यांनी करावं, 2019मध्ये मी तुमच्याकडे पाहतो, असा इशारा मोदींनी खासदारांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहसह सर्व खासदारांनी भाजपाच्या बैठकीत सहभाग घेतला होता.

गेल्याच आठवड्यात अमित शहादेखील खासदारांना रागवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...